आरबीआयला बॅंकेला बॉम्बने उडवण्याची धमकी; गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

आरबीआयला बॅंकेला बॉम्बने उडवण्याची धमकी; गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली असून यामुळे एकच खळबळ माजली आहे.

नवी दिल्ली : मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली असून यामुळे एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरबीआयला बॅंकेला बॉम्बने उडवण्याची धमकी; गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
वंचितला मविआत स्थान मिळणार? चव्हाणांनी थेट सांगितलं, म्हणाले...

माहितीनुसार, आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह 11 ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी या सर्व ठिकाणी शोध घेतला. मात्र काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

काय आहे ई-मेलमध्ये?

मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी 11 बॉम्ब लावले आहेत. RBI ने खाजगी क्षेत्रातील बँकांसह भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यात आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि काही उच्च बँकिंग अधिकारी तसेच भारताचे काही नामांकित मंत्री यांचा समावेश आहे. याप्रकरणी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आरबीआय गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि घोटाळ्याच्या संपूर्ण प्रकटीकरणासह एक प्रेस स्टेटमेंट जारी करा, अशी मागणी अज्ञातांनी ई-मेलद्वारे केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com