School Reopen | मुंबईतील शाळांची घंटा वाजणार; ‘या’ तारखेपासून भरणार वर्ग

School Reopen | मुंबईतील शाळांची घंटा वाजणार; ‘या’ तारखेपासून भरणार वर्ग

Published by :
Published on

मुंबईतील शाळा 4 ऑक्टोबरपासून सूरू होणार आहेत. मुंबईतील सर्व माध्यमांच्या, व्यवस्थापनच्या आणि मंडळांच्या 8 वी ते 12 वी च्या शाळा सुरू होणार असून यासंबधी अधिकृत परिपत्रक पालिका शिक्षण विभागाकडून लवकरच जारी करण्यात येणार आहे.

राज्याच्या कोविड 19 ची रुग्णसंख्या कमी असलेल्या विविध जिल्ह्यांत 8 वी ते 22 वी च्या शाळा सुरू आहेत. मात्र मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा या मागील दीड वर्षात प्रथमच उघडल्या जाणार आहेत. राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यावर मुंबई पालिका शिक्षण विभागाकडे पालिका आयुक्तांकडे यासंबधी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला आज, बुधवारी मंजुरी मिळाली असून शिक्षण विभागाकडून यासंबधी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार आहेत. आयुक्त इकबाल सिंह यांनीही ट्विट करत ही माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com