Mumbai Torres Jewellery Scam : गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक; कंपनीचा मालक पसार

मुंबई टोरेस ज्वेलरी घोटाळा: गुंतवणूकदारांची फसवणूक, कंपनीचा मालक फरार. उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये गोळा केले.
Published by :
shweta walge

टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केली आहे. "प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड" या कंपनीतर्फे 'टोरेस' या नावाने २०२४ च्या प्रारंभात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर या शहरांमध्ये व्यवसाय सुरू करण्यात आला होता. कंपनीने सुरुवातीला दागिन्यांची विक्री केली, त्यानंतर कृत्रिम हिरे आणि नंतर रोख रकमेत गुंतवणूक स्वीकारून उच्च परताव्याचे आमिष दाखवले. प्रत्येक आठवड्यात पाच ते साडेअकरा टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे वचन दिले गेले होते.

सुरुवातीला, चांगला परतावा मिळाल्यामुळे राज्यभरातील नागरिकांनी गुंतवणूक केली. मात्र, काही आठवड्यांनंतर परतावा येणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये शंका निर्माण झाली.

दादर येथील कंपनीच्या शाखेत गोंधळ उडाल्यानंतर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संचालक सर्वेश सुर्वे, उझबेकिस्तानची नागरिक तानिया आणि रशियाची नागरिक व्हॅलेंटिना स्टोअर यांना अटक करण्यात आली. कंपनीचे सीईओ तौफिक शेख (कार्टर) आणि व्हिक्टोरिया कोवलेंका हे दोघे फरार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com