महाराष्ट्र
Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे 'या' तारखेपासून आंदोलन
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली scroll करा...
(Mumbai University) मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ॲकॅडेमिक स्टाफ असोसिएशन’ने 17 नोव्हेंबरपासून आंदोलनचा इशारा दिला. विद्यापीठ प्रशासनाचा काळी फीत बांधून आणि निषेध पट्टी लावून निषेध नोंदविला जाणार आहे.
मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांच्या पदोन्नती, निवृत्तीवेतन, रिक्त पदांची भरती आणि निकालाला होत असलेल्या विलंबासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्यांची पूर्तता तात्काळ न झाल्यास तीन टप्प्यांत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून याबाबतचे पत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांना दिले आहे.
Summery
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे आंदोलन
17 नोव्हेंबरपासून करणार आंदोलन
विविध मागण्यांसाठी करणार आंदोलन
