मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, दुरुस्तीच्या कामामुळे आज पाणीकपात

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, दुरुस्तीच्या कामामुळे आज पाणीकपात

Published by :
Published on

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप संकूल इथल्या उदंचन केंद्रात दुरुस्तीच्या कामासाठी पाणीकपात होणार आहेत. आज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत संपूर्ण मुंबईत सुमारे १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

याशिवाय पवई इथं तानसा पूर्व- आणि तानसा पश्चिम जलवाहिनीवरचं गळती रोखण्याचं कामही हाती घेण्यात येत असल्यामुळे २६ ऑक्टबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत के-पूर्व, एस, जी उत्तर आणि एच पूर्व या विभागात काही परिसरामधे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com