महाराष्ट्र
सरकारने ठोस पावले न उचलल्यास रस्त्यावर उतरणार; युवती सेना महिला आघाडीचा इशारा
मणिपूरमध्ये हिंदुस्थानाला शरमेने मान खाली घालावी लागली अशा घटना घडल्या आहेत. या घटनांना आळा बसावा, अशी भूमिका युवती सेनेने राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे मांडली.
मुंबई: मणिपूरमध्ये भारताला शरमेने मान खाली घालावी लागली, अशा घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रातही महिलांवर अत्याचार, बलात्कार, महिला मुली बेपत्ता यांसारखे प्रकार मोठया प्रमाणात वाढले आहेत. सर्वत्रच महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या घटनांना आळा बसावा, अशी भूमिका आज युवती सेनेने राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे मांडली.
राज्यात महिला सुरक्षततेबाबत ठोस पावले उचलावी, शक्ती कायद्याची अंमलबजावणी तातडीने करावी या मागणीसाठी राज्यपाल रमेश बैस यांना भेटून युवती सेनेच्या वतीने राज्यपालांना निवेदन देण्यात आले.
यावर योग्य तो तोडगा न काढल्यास शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल, असा इशारा यावेळी युवती सेना व महिला आघाडीच्या वतीने सरकारला देण्यात आला.