Election : महानगरपालिका निवडणुकीसाठी हालचालींना वेग; आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Election) आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज महानगरपालिका निवडणुकीसाठी हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत असून आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. मात्र अद्यापही युती आणि आघाडीचे उमेदवार गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांतील इच्छुकांची धाकधूक वाढल्याचे पाहायला मिळत असून शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल होताना धावपळ होणार आहे.
Summery
महानगरपालिका निवडणुकीसाठी हालचालींना वेग
आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत
मात्र अद्यापही युती आणि आघाडीचे उमेदवार गुलदस्त्यात
