Municipal Elections 2026
CONGRESS SUFFERS MAJOR SETBACK AS AMBERNATH LEADERS JOIN BJP

Municipal Elections 2026 : निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा धक्का, भाजपची जोरदार खेळी; राजकीय समीकरणं बदलली

Maharashtra Politics: अंबरनाथ शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी १२ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी तापली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होईल. प्रचारकार्य जोरकस घेत असताना, तिकीट वाटपावरून सर्वच पक्षांत नाराजगीचा उद्रेक झाला आहे. काही ठिकाणी नाराज कार्यकर्त्यांनी पक्ष सभांमध्ये गोंधळ घातला, तर काहींनी नेत्यांच्या वाहनांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर पक्षांतराची लाट उसळली असून, भाजपकडे सर्वाधिक इनकमिंग होतेय.

महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे. अंबरनाथ शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी आपल्या १२ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ऐन निवडणुकीपूर्वी हा पक्षप्रवेश काँग्रेससाठी मोठा धोका मानला जात आहे.

प्रदीप पाटील यांनी पक्षप्रवेशापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर आरोप केले. बोलताना पाटील म्हणाले, "हर्षवर्धन सपकाळ यांनी माझ्याकडून ब्लॉक अध्यक्षपदासाठी एक कोटी रुपयांची मागणी केली. आम्ही युती संदर्भात त्यांना सांगितले होते, पण कारवाई करून चुकीचे पाऊल उचलले. काँग्रेसने निवडणुकीत आम्हाला एकदाही विचारले नाही, आम्ही आमच्या जोरावर निवडून आलो." पाटील यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लवकरच भाजपात सामील होणार आहोत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्येही इतर पक्षांतून भाजपकडे जोरदार इनकमिंग झाली होती. महापालिका निवडणुकीतही हाच ट्रेंड दिसतेय. मात्र, भाजपमधील ज्या इच्छुकांना तिकीट मिळाले नाही, ते नाराज झाले असून, पक्षांत अंतर्गत तणाव वाढला आहे. निवडणुकीची रणधुमाळी आणखी तीव्र होत असताना, पक्षांतराच्या या लाटेमुळे मतदारांच्या मनातील चित्र कसे बदलेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com