Mahayuti : महापालिका निवडणूक: राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Mahayuti )महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
राज्यातील 8 महापालिकेत एकूण 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपच्या 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, केडीएमसीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध आले आहेत.
यासोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अहिल्यानगरमध्ये 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये 12 उमेदवार सर्वाधिक भाजपचे आहेत.
Summary
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध
भाजपचे सर्वाधिक म्हणजेच 12 उमेदवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 7 उमेदवार, दादांच्या राष्ट्रवादीचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी
