Elections
महाराष्ट्र
Elections : महापालिकेची निवडणूक डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Elections) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच आता डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी या बैठकीत मतदार याद्या अंतिमरीत्या प्रसिद्ध करण्याबाबत आयुक्तांना विचारणा केली. आयोगाने या याद्या 10 डिसेंबरला प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांची ऑनलाइन बैठक घेतली. त्यात निवडणुकीसाठीची आमची तयारी असल्याचे सर्वांनी सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
महापालिका निवडणुकांचं बिगुल डिसेंबरमध्ये वाजणार?
महापालिकेची निवडणूक डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात?
राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
