Ravindra Chavan : 'या' महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ravindra Chavan) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यासाठी अनेक बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. यातच काल एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांच्यात बैठक झाली. याच पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत रविंद्र चव्हाण म्हणाले की, "देवेंद्रजी, एकनाथराव शिंदेजी आणि सर्वांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. 20 तारखेला काही प्रलंबित अशा निवडणुका आहेत. त्यासंदर्भात कशा पद्धतीने पुढे जायचं आहे. यासंबंधी चर्चा ही बैठकीत झाली."
"ही चर्चा जेव्हा सुरू होती त्याचवेळेला आगामी ज्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या संदर्भामध्येसुद्धा कशा पद्धतीने पुढे जायला हवं यासंदर्भात चर्चा झाली. येणाऱ्या काळामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत या महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे."
यासोबतच ते पुढे म्हणाले की, "मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत युती व्हायलाच हवी. या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितले."
Summery
'पालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीसाठी ठाम'
पत्रकार परिषदेतून रवींद्र चव्हाणांची माहिती
'मनपा निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता'
