Election : महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण; उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Election) आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.
2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते. काल 31 डिसेंबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली.
आता 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी जागांपेक्षा अर्जांची संख्या अधिक असल्याचं समोर आल्याची माहिती मिळत आहे.
Summary
महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू
2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार
