Feeding Pigeon
Feeding Pigeon

Feeding Pigeon : कबुतरांना खायला देणं पडलं महागात; 1 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत लाखो रुपयांचा दंड वसूल

राज्यात सध्या कबुतरखान्याच्या मुद्दा तापला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Feeding Pigeon ) राज्यात सध्या कबुतरखान्याच्या मुद्दा तापला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेने कारवाई गतीमान केल्याने विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वोच्च न्यायालयानेही कबुतरखान्यांवरील बंदी कायम ठेवल्याने मुंबई महापालिकेने अंमलबजावणीत गती आणली आहे. 1 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांकडून तब्बल 1 लाख 32 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सर्वाधिक प्रभावी कारवाई दादर परिसरात झाली, येथे 28 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. गेटवे ऑफ इंडिया आणि जीपीओ परिसरातील कबुतरखान्यांमधूनही मोठ्या प्रमाणात दंड वसूल झाला असून या भागातून 12 हजार 500 रुपये वसूल करण्यात आले.

पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाने कारवाई रोखण्यास नकार दिल्यानंतर नियमभंग सहन केला जाणार नाही. कबुतरखान्यांवर टाकलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

जरी न्यायालयांनी बंदी कायम ठेवली असली तरी काही ठिकाणी अजूनही खाद्य टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे पुढील काळात कारवाईची तीव्रता अधिक वाढवण्याचे संकेत महापालिकेकडून देण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com