मुन्नाभाई स्टाईल कॉपी करणाऱ्यास नाशिक पोलिसांकडून अटक

मुन्नाभाई स्टाईल कॉपी करणाऱ्यास नाशिक पोलिसांकडून अटक

छत्रपती संभाजीनागरच्या या मुन्नाभाईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
Published on

महेश महाले | नाशिक : मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाच्या कथेत ज्याप्रकारे कॉपी करण्याचे प्रकार दाखविला होता. तसाच प्रकार नाशिकमध्ये घडला असून छत्रपती संभाजीनागरच्या या मुन्नाभाईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अर्जुन मेहेर, राहूल नागलोथ व अर्जुन राजपूत अशा तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लिपिक व इतर पदांच्या भरतीसाठी नाशिकमध्ये रविवारी परीक्षा घेण्यात आली. नाशिक रोड येथील आर्टिलरी सेंटर भागातील फ्युचर टेक सोल्युशन केंद्रावर ही परीक्षा सुरू होती. अर्जुन मेहेर या परीक्षार्थीच्या जागेवर राहूल नागलोथ या डमी उमेदवाराने परीक्षा दिली. त्याने बटन कॅमेरा आणि ब्लूटूथच्या साह्याने प्रश्नपत्रिकेचा फोटो बाहेर पाठवला आणि केंद्राबाहेर उभ्या असलेल्या अर्जुन राजपूत याने प्रश्नांची माहिती दिली.

त्यामुळे पोलिसांनी राजपूत आणि नागलोथ याला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी उपनगर पोलीस ठाणे करत आहे. परीक्षेचे हे रॅकेट अजून मोठे असल्याचा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त केला जात असून लिपिक पदाच्या परीक्षेसाठी आलेल्या सर्व परीक्षार्थींची चौकशी करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com