कंडोममुळे झाला हत्येचा उलगडा, दोन तृतीयपंथीना अटक

कंडोममुळे झाला हत्येचा उलगडा, दोन तृतीयपंथीना अटक

Published by :
Published on

सुशांत डुंबरे, पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवडमध्ये कंडोममुळे एका हत्येचा उलगडा झाला आहे. बसवराज इटकल नामक व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांना घटनास्थळी कंडोम आढळून आले होते. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन तृतीयपंथीना अटक केली.

पिंपरी चिंचवड शहरात बसवराज इटकल या इसमाची हत्या करण्यात आली होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास प्रीमियर कंपनी शेजारी मोकळ्या जागेत मयत बसवराज इटकल ह्याचा मृतदेह आढळून आला होता. त्य़ामुळे खळबळ उडाली होती. प्राथमिक अंदाजे हा प्रकार अकस्मात असल्याचं निदर्शनास आले, मात्र अधिकचा तपास सुरू असताना मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला त्याठिकाणी कंडोम मिळून आल्याने तपासाची चक्रे फिरवत ही हत्या याठिकाणी तृतीयपंथी देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचा संशय होता. त्यावेळी दोन तृतीयपंथी यांनी पैशासाठी बसवराज इटकल यांचा गळा दाबून घातल्या केल्याचं चौकशीत निष्पन्न झाले होते. याप्रकरणी तृतीयपंथी असलेल्या अंजली बाळू जाधव,अनिता शिवाजी माने यांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अधिक तपास सूरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com