Maharashtra Local Body Election
Maharashtra Local Body Election

Maharashtra Local Body Election : 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Maharashtra Local Body Election) नगरपरिषदा आणि नगर पंचायतींच्या काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्या निवडणुकांसाठी मतदान 20 डिसेंबरला होणार आहे आणि मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्याचे नागपूर खंडपीठाने सांगितले.

मात्र या निवडणुका अचानक पुढे ढकलण्यात आल्याने या निकालाला राजकिरण बर्वे आणि एमआयएमचे प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद युसूफ पुंजानी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांनी यावर लगेच मतमोजणीची मागणी केली असून याचिकेवर आज सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे तातडीची सुनावणी पार पडली.

यावर आता नगरपंचायत, नगरपरिषदेचा निकाल 21 डिसेंबरलाच होणार असल्याचे सुप्रीय कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. 21 तारखेपूर्वी मतमोजणी घेण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. यासोबतच राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करणे निवडणूक आयोगासाठी बंधनकारक असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

Summery

  • नगरपंचायत, नगरपरिषदेचा निकाल 21 डिसेंबरलाच

  • मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार- सुप्रीम कोर्ट

  • नागपूर खंडपीठाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com