Nagpur : शहरातील प्रसिद्ध आरजे राजन यांचे ब्रेन हॅमरेजने निधन

Nagpur : शहरातील प्रसिद्ध आरजे राजन यांचे ब्रेन हॅमरेजने निधन

राजनने 2009 मध्ये रेडिओ मिर्चीमधून आरजे म्हणून करिअरला सुरुवात केली. सध्या ते माय एफएममध्ये आरजे होते.
Published by :
shweta walge

नागपूर : शहरातील प्रसिद्ध रेडिओ जॉकी राजन (आरजे राजन) उर्फ ​​राजेश अलोने यांचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झालं आहे. सकाळी आठ वाजता त्यांना ब्रेन हॅमरेज झाला, त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचारादरम्यान सकाळी 10.30 वाजता राजनचा मृत्यू झाला.

शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राजनने पत्नीला डोकेदुखी होत असल्याचे सांगितले. काही वेळातच ब्रेन हॅमरेज झाला. यानंतर नातेवाइकांनी त्यांना तत्काळ धंतोली येथील खासगी रुग्णालयात नेऊन दाखल केले. 10.30 वाजता राजन यांचे निधन झाले. शहरातील प्रसिद्ध आरजे राजन यांच्या निधनाचे वृत्त येताच शहरात शोककळा पसरली आहे.

राजनने 2009 मध्ये रेडिओ मिर्चीमधून आरजे म्हणून करिअरला सुरुवात केली. सध्या ते माय एफएममध्ये आरजे होते. ते सकाळी ७ ते ११ या वेळेत अ‍ॅम्बियन्स मॉर्निंग शो होस्ट करत असे. राजन अनु कपूरच्या 'खेलो गाओ जीतो' आणि सचिन पिळगावकरच्या 'म्युझिक, मस्ती, धूम' या टीव्ही शोमध्येही दिसला आहे. राजनचे अनेक शो आरजे म्हणून लोकप्रिय झाले. ज्यामध्ये ‘माहोल मॉर्निग’, ‘पुरानी जिन्स’ आणि ‘चांदनी राते’ यांचा समावेश होता. ‘माय एफएम का बडा राजन’ म्हणून ‘माहोल मॉर्निंग’मध्ये त्यांनी केलेली आत्मपरिचय श्रोत्यांमध्ये लोकप्रिय झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com