Nagpur Rain
महाराष्ट्र
Nagpur Rain : नागपुरात पावसाचा कहर; 50 हून अधिक वस्त्यांमध्ये शिरलं पाणी
राज्यात पुन्हा एकदा ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली
( Nagpur Rains ) राज्यात पुन्हा एकदा ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली असून विविध भागांत नागपुरात पावसाची संततधार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाने गंभीर पूरस्थिती निर्माण केली आहे. नागनदी, पोहरानदी, पिवळी नदीला पूर आल्याचे पाहायला मिळत आहे.
50 हून अधिक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरलं असून शहरातील 23 प्रमुख रस्त्यावर पाणी साचल्याने नदीचं स्वरुप आले आहे. पुरात अडकलेल्या 47 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून या मुसळधार पावसामुळे 11 जनावरं मृत झाल्याची माहिती मिळत असून 453 घरांचं नुकसान झाल्याची माहिती आहे.
सध्या संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहेत. गेल्या 24 तासात नागपूरात 95.6 मिलिमीटर आहे.