School Bus Accident
School Bus Accident

School Bus Accident : नागपूरमध्ये दोन स्कूल बसचा अपघात; काही विद्यार्थी जखमी

लहान स्कूल बसच्या समोरच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

नागपूरमध्ये दोन स्कूल बसचा अपघात

काही विद्यार्थी जखमी

लहान स्कूल बसच्या समोरच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

(School Bus Accident) नागपूर छिंदवाडा महामार्गावर दोन स्कूल बसेसची एकमेकांना धडक बसून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

नागपूर छिंदवाडा राष्ट्रीय महामार्गावरील मानकापूर उड्डाणपुलावर एका बाजूने दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या मोठ्या आणि लहान स्कूल बसेस एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्कूल बस अनियंत्रित होऊन समोरासमोर एकमेकांना धडकली. या दुर्घटनेत लहान स्कूल बसच्या समोरच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com