महिला करत आहेत ज्वेलर्स दुकानातून दागिन्यांची चोरी

महिला करत आहेत ज्वेलर्स दुकानातून दागिन्यांची चोरी

Published by :
Published on

कल्पना नळस्कर, नागपूर
नागपूर शहरांमधील बजाज नगर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दोन चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. 22 ऑक्टोबरला नागपुर मधील श्रद्धानंद पेठ मधील तनिष्क ज्वेलरी मध्ये 40 ते 45 वयोगटातील दोन महिला नऊ वर्षाच्या मुलासोबत आल्या. त्यांनी दीड लाखाच्यावर किंमत असलेल्या सोन्याच्या बांगड्या हात सफाईने चोरून नेल्या. तर दुसरी घटना 23 ऑक्टोबरला बजाजनगरच्या वेस्ट हायकोर्ट रोड वरील वामन हरी पेठे ज्वेलर्स या ठिकाणी 35 ते 40 वयोगटातील दोन महिला लहान मुलासोबत आल्या होत्या.

दागिन्यांची चोरीचा हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे. त्यातूनच या महिलांचे फोटो काढत पोलिसांनी वायरल केले आहेत. नागरिकांना आणि ज्वेलर्सना आवाहन केले आहे की या महिला दिसल्यास नागपूर पोलिसांना त्याची माहिती द्यावी. ही चोरी करणारी महिलांची टोळी आंतरराजिय असल्याचा पोलिसांना संशय आहे. याचा तपास पोलीस करीत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com