Sanjay Raut and Nana patole
Sanjay Raut and Nana patole team lokshahi

"बलिदानाची पार्श्वभूमी नाही त्यांना काँग्रेस काय कळणार?"

नाना पटोलेंचा शिवसेनेवर पलटवार
Published by :
Shweta Chavan-Zagade

पंजाबसह (Punjab) इतर चार राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाला होता. पंजाबमधील सत्ता गेल्याने पक्षातील अंतर्गत वाद पेटला होता. यानंतर माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल जाखड (Sunil Jakhar) यांनी काँग्रेसला रामराम करून आठवड्याच्या आतच त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे.

तर गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांनी नुकतीच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातून काँग्रेस नेतृत्वाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका करण्यात आली आहे. शिवसेनेनं केलेल्या या टीकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेवर पलटवार केला आहे. ज्यांना बलिदानाची पार्श्वभूमी नाही त्यांना काँग्रेस काय कळणार? असा सवाल पटोले यांनी विचारला आहे.

Sanjay Raut and Nana patole
Sanjay Raut : छत्रपती संभाजी राजेंनी शिवसेनेत यावं, त्यांच्या खासदारकीबद्दल निर्णय घेऊ

'काँग्रेस एक विचार आहे. विचार कधीही संपत नाही. देशाचा स्वातंत्र्यलढा असो वा महासत्ता बनवण्यासाठीचे प्रयत्न, यामध्ये काँग्रेसने नेहमीच स्वत:ला झोकून दिलेलं आहे. आज आम्ही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत. केंद्रातल्या भाजप सरकारमुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सरकारी मालमत्ता विकली जात आहे. या गोष्टींवर अग्रलेख लिहायची गरज आहे,' असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

Sanjay Raut and Nana patole
NCP Vs Congress : आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादीने केलेल्या नियुक्ता काँग्रेसकडून रद्द

'सोबत राहून घात करू नका'

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत आहोत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पाहिलं असेल, काही लोकं भाजपलाच मदत करण्याचा प्रयत्न करून घात करत आहेत. निधीच्या समतोलावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालायला हवं, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com