Nanded BJP
Nanded BJP

Nanded BJP : भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 उमेदवार; नांदेडच्या लोहा नगरपरिषदेतील प्रकार

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nanded BJP) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यामध्ये नेत्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाच मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली जात असल्याचं पाहायला मिळते.

यातच भाजपकडून नांदेड जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या या उमेदवारांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषद निवडणुकीत हे समोर आलं असून, भारतीय जनता पार्टीने एकाच कुटुंबातील तब्बल सहा सदस्यांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.स्थानिक विरोधकांकडून यावर टीका केली जात आहे.

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी

• नगराध्यक्ष पदासाठी : गजानन सूर्यवंशी

• नगरसेवक पदासाठी :

• गोदावरी सूर्यवंशी (पत्नी)

• सचिन सूर्यवंशी (भाऊ)

• सुप्रिया सचिन सूर्यवंशी (भावाची पत्नी)

• युवराज वाघमारे (मेहुणा)

• रीना अमोल व्यवहारे (भाच्याची पत्नी)

Summery

  • भाजपकडून ‘एकाच कुटुंबातील 6 उमेदवार’

  • नांदेडच्या लोहा नगरपरिषदेतील प्रकार

  • 6 सदस्यांना उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com