Nashik : अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई; तब्बल १९४ किलो भेसळयुक्त पनीर जप्त

Nashik : अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई; तब्बल १९४ किलो भेसळयुक्त पनीर जप्त

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महेश महाले, नाशिक

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलं आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील अंबड-लिंक रोड येथील मे.तिस्ता क्रोप केअर प्रा.लि. या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या कारखान्याची तपासणी केली असता तेथे रिफाईन्ड पोमोलिन ऑईल, (unknown white solid flakes) (adulterant) चा वापर करून पनीर अन्नपदार्थ बनवित असल्याचे आढळून आले.

त्यामुळे या कारखान्याच्या ठिकाणी पनीर, रिफाईन्ड पोमोलिन ऑईल, unknown white solid flakes (adulterant) आणि मिक्स मिल्क या अन्नपदार्थाचे अन्न नमुने घेण्यात आले. यात ४६ हजार ५६० रुपये किंमतीचे १९४ किलो पनीर, १४ हजार ९६० रुपये किंमतीचे ८८ लीटर रिफाईन्ड पोमोलिन ऑईलचा किलो, ४४ हजार ९६० किंमतीचे १४९८ लीटर मिक्स मिल्क असा एकूण १ लाख ६ हजार ४६० रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

या कारवाईत पनीर आणि मिक्स मिल्कचा साठा नष्ट करण्यात आला. तर रिफाईन्ड पोमोलिन ऑईलचा साठा अन्न व्यावसायिकाच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. यात चारही अन्ननमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषक यांच्याकडे पाठविण्यात आला असून, विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर विश्लेषण अहवालाच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा मानके कायदयाअंतर्गत पुढील आवश्यक कारवाई करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com