Navi Mumbai Airport
Navi Mumbai Airport

Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून सेवेत; पहिल्या दिवशी किती उड्डाणं?

नवी मुंबई विमानतळ उद्यापासून सुरू होत आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Navi Mumbai Airport) नवी मुंबई विमानतळ उद्यापासून सुरू होत आहे. उद्या 25 डिसेंबर 2025 रोजी पहिली व्यावसायिक विमानसेवा सुरू होत आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे.

नवी मुंबई विमानतळ हे टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. या विमानतळाहून पहिल्या टप्प्यात इंडिगो, एअर इंडिया, आकासा आणि स्टार एअर या विमान कंपन्या सेवा देणार आहेत. पहिल्याच दिवशी 30 उड्डाणं होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बेंगळुरूहून येणारे फ्लाइट क्रमांक 6E 460 सकाळी 08.00 वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरणार आहे. त्यानंतर फ्लाइट क्रमांक 6E 882 सकाळी 08.40 वाजता हैदराबादकडे रवाना होणार आहे.

Summary

  • नवी मुंबई विमानतळ उद्यापासून सुरू

  • नाताळच्या मुहूर्तावर पहिली नियमित विमानसेवा सुरू

  • नवी मुंबईतून पहिल्या दिवशी 30 विमानांचं उड्डाण

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com