नवी मुंबई एपीएमसी मार्केट आज बंद राहणार; कारण काय?

नवी मुंबई एपीएमसी मार्केट आज बंद राहणार; कारण काय?

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आज बंद राहणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आज बंद राहणार आहे. मनोज जरांगे यांची पदयात्रेचा नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मुक्काम असणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज पूर्णपणे बंद असणार आहे पाचही मार्केट जे आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि प्रशासनाने घेतला आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांसह मुंबईकडे निघाले आहेत. यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळपासून जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

25 जानेवारीला जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसह नवी मुंबईमध्ये प्रवेश करतील. मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणारे त्यांच्यासोबत लाखो मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे. एपीएमसी मार्केट बंद ठेऊन मराठा आंदोलकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com