नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाचा भोंगळ कारभार

नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाचा भोंगळ कारभार

Published by :
Published on

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई | नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महिलेची प्रसुती झाल्यानंतर जन्म झालेल्या नवजात बालकाबाबत माहिती देताना नातेवाईक आणि आईमध्ये संभ्रम निर्माण केल्याची घटना घडली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. प्रसूती झालेल्या महिलेस प्रथम मुलगी झाल्याचे सांगण्यात आले व काही वेळ नवजात बाळाला ऑक्सिजन वर ठेवल्यानंतर आईकडे देताना मुलगा असल्याचे सांगितल्याने एकच गोंधळ उडाला.

रूग्णालयांकडून माहिती देताना पहिल्या वेळेस वेगळं व नंतर वेगळं सांगितल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत, मुलगी सांगितले असताना मुलगा कसा घ्यायचा असा सवाल उपस्थित केला. बाळाचे DNA टेस्ट करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

दरम्यान यासंदर्भात रुग्णालयाशी संपर्क साधला असता त्या महिलेस मुलगाच झाला असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. याविषयी नातेवाईकांनी आपण बाळाला पाहिले असून मुलगीच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलेय. तर रुग्णालयात वारंवार असे गोंधळ होत असून पहिला DNA टेस्ट करून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यानी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com