Navnath Ban
Navnath Ban

Navnath Ban : भाजपकडून युवा चेहऱ्यांना संधी; घाटकोपर भटवाडी वॉर्ड क्रमांक 135 मधून भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना उमेदवारी

आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Navnath Ban) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन करण्यात आले असून अनेक पक्षाकडून उमेदवारी अर्ज जाहीर करण्यात येत आहेत.

भाजपकडून आता युवा चेहऱ्यांना संधी देण्यात येत असून भाजपकडून युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना वॉर्ड क्रमांक ४७ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना देखील वॉर्ड क्रमांक १३५ मधून उमेदवारी देण्यात आली आहे.

यासोबतच माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी वॉर्ड क्रमांक ९ मधून तर माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक १० मधून उमेदवारी देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहेत. या सर्वांना भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे.

Summery

  • भाजपकडून युवा चेहऱ्यांना संधी

  • भाजपकडून युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना वॉर्ड क्रमांक ४७ निवडणुकीच्या रिंगणात

  • सोबतच, माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना देखील वॉर्ड क्रमांक १३५ मधून उमेदवारी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com