Navnath Waghmare
Navnath Waghmare

Navnath Waghmare : नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली Video

जालना शहरातल्या नीलम नगर भागातील घटना
Published on

थोडक्यात

  • नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली

  • जालना शहरातल्या नीलम नगर भागातील घटना

  • परिसरातील नागरिकांनी पाणी मारुन आग विझवली

(Navnath Waghmare) जालन्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नीलम नगर परिसरात अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून ही घटना घडवून आणली असून हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी गाडी पेटवल्याचा संशय नवनाथ वाघमारे यांनी व्यक्त केला आहे. सत्य बोलणाऱ्यांच्या विरोधात अशा घटना घडवल्या जातात, पण गाडी जाळली म्हणून मी गप्प बसणार नाही, असं नवनाथ वाघमारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

रात्रीच्या सुमारास एका व्यक्तीने नवनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर उभी केलेली गाडी पेट्रोल टाकून पेटवली. ही घटना लक्षात येताच आग तातडीने विझवण्यात आली. त्यामुळे या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे करीत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com