Navneet rana
महाराष्ट्र
नवनीत राणांनी युसूफ लकडावालाकडून कर्ज घेतलं ?; संजय राऊतांकडून 'पोलखोल'
युसूफ लकडावाला याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. तसेच याच लकडावालाचा डी गँगशीही संबंध असल्याचाही खुलासा त्यांनी केला.
राणा दाम्पत्य विरूद्ध शिवसेना यांच्यातील शाब्दीक युद्ध थांबायच नाव घेत नाही आहे. त्यात आता खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नवनीत राणांनी डी गॅंगशी संबंधित युसूफ लकडावालाकडून कर्ज घेतल्याचा आरोप केला आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. तुरुंगात मरण पावलेल्या युसूफ लकडावाला यांच्याकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. तसेच हा युसूफ लकडावाला याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. तसेच याच लकडावालाचा डी गँगशीही संबंध असल्याचाही खुलासा त्यांनी केला.
गंभीर आरोप केल्यानंतर संजय राऊत यांनी ईडीने याची चौकशी केली का? हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे! असा रोख ठोक सवाल केला आहे.