Navneet ravi rana
Navneet ravi rana Team Lokshahi

Navneet - Ravi Rana : राणा दाम्पत्याला खार पोलिसांकडून अटक

कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण केल्यानं राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.
Published by :
Published on

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. कलम 153 (A) अंतर्गत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Navneet ravi rana
राणांसाठी धावून येणार नारायण राणे; म्हणाले, कोण अडवतो मी पाहतो...

'मातोश्री'समोर हनुमान चालिसा (hanuman chalisa) पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने (Navneet Rana) मागे घेतली. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचं कारण देत आपण हे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा राणा दाम्पत्यांने केली. यानंतर सुद्धा शिवसेना आक्रमक झाली होती. त्यांनी त्यांच्या खार मधल्या घराबाहेर गर्दी केली होती. तसेच राणा दाम्पत्यांनी माफी मागावी अशा घोषणा दिल्या होत्या.

दरम्यान खार पोलीसांनी राणा दाम्पत्याची घरी पोहोचत त्यांना अटक केली. चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. उद्या राणा दाम्पत्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com