nawab malikteam lokshahi
महाराष्ट्र
नवाब मलिकांची कोठडीत वाढ; कोर्टात आरोपपत्र दाखल
मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering case) विशेष ईडी (ED) न्यायालयाने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नवाब मलिक (nawab malik) यांच्या कोठडीत 20 मे पर्यंत वाढ केली आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडी संदर्भात मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे.
मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडी संदर्भात मुंबईतील विशेष पी. एम. एल. ए. न्यायालयात आज ही सुनावणी झाली आहे. ईडीने मलिकांच्या प्रकरणात 5000 अधिक पाणी आरोपपत्र कोर्टात दाखल केलं आहे. त्यामुळे आता २० मे पर्यंत त्यांना कोठडीतच मुक्काम करावा लागणार आहे.