NCP Star campaigner list : राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर; 'या' नेत्यांचा समावेश
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
(NCP Star campaigner list) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. आगामी नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केली आहे. मात्र या स्टार प्रचारकांच्या यादीत रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव नसल्याचे पाहायला मिळत आहे.
यामुळे आता चर्चा रंगल्या आहेत. या स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, मंत्री नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, अण्णा बनसोडे, अदितीताई तटकरे, इंद्रनील नाईक, धर्मरावबाबा आत्राम, अनिल भाईदास पाटील, संजय बनसोडे, प्रताप पाटील - चिखलीकर
नवाब मलिक, सयाजी शिंदे, मुश्ताक अंतुले, समीर भुजबळ, अमोल मिटकरी, सना मलिक - शेख, रुपालीताई चाकणकर, इद्रीस नायकवडी, अनिकेत तटकरे, झिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन, सिध्दार्थ कांबळे, सुरज चव्हाण, लहू कानडे, कल्याण आखाडे, सुनिल मगरे, नाझेर काझी, महेश शिंदे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, नजीब मुल्ला, श्रीमती प्रतिभाताई शिंदे, विकास पासलकर यांचा समावेश आहे.
