Prashant Jagtap : प्रशांत जगताप यांची कोंडी; काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांच्या उमेदवारीला अडचण?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Prashant Jagtap) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सुप्रिया सुळे यांच्याकडे प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलाय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास प्रशांत जगताप यांचा विरोध होता.
ज्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रित आघाडीची घोषणा होईल त्यावेळी मी राजीनामा देईन, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं होतं. यातच प्रशांत जगताप कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा सुरू झाली आणि काल प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रशांत जगताप यांनी टिळक भवन दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
यानंतर आता प्रशांत जगताप यांच्या उमेदवारीला अडचण निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादीकडून काँग्रेसवासी झालेल्या प्रशांत जगताप लढवणार असलेल्या दोन जागांची ठाम मागणी करण्यात आली आहे. प्रशांत जगताप यांची उमेदवारी अडचणीत आली असून अंतिम निर्णय सुप्रिया सुळे घेणार असल्याची पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आता प्रशांत जगताप यांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Summery
काँग्रेसवासी झालेल्या प्रशांत जगताप यांची कोंडी
जगताप यांनी मागितलेल्या जागांवरुन मतभेद
प्रशांत जगताप यांच्या उमेदवारीला अडचण?
