आमदार राजू नवघरेंकडून गंभीर चूक; ‘त्या’ कृतीवर म्हणाले…

आमदार राजू नवघरेंकडून गंभीर चूक; ‘त्या’ कृतीवर म्हणाले…

Published by :
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला अश्वावरच चढून हार घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेचे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजू नवघरे यांच्यावर टीका होऊ लागली. मात्र, आपल्याकडून चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर राजू नवघरे यांनी जाहीर माफी देखील मागितली आहे.

"छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मी कार्यकर्ता आहे. माझ्यासोबत तिथे सगळे आले आणि मला वर चढवलं. माझी चूक असेल, तर मी माफी मागतो. मी एकटाच चढलो असं दाखवलं जात आहे. मी एकट्यानंच पाप केलं असेल तर मी त्यासाठी फाशीला जायला तयार आहे. पण माझी काहीही चूक नसताना आमदार झाल्यापासून मला त्रास देण्याचं काम केलं जात आहे", असं राजू नवघरे यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com