Sangram Jagtap : राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

(Sangram Jagtap )राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देणारा टेक्स्ट मेसेज त्यांचे स्वीय सहाय्यकाच्या मोबाईलवर आला आहे.

या मेसेजमध्ये “संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा” असा थेट जीवे मारण्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्राम जगताप हे अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com