Mumbai Bank Election: प्रविण दरेकरांना मोठा धक्का; मुबै बॅंकेच्या चाव्या महाविकास आघाडीच्या हाती

Mumbai Bank Election: प्रविण दरेकरांना मोठा धक्का; मुबै बॅंकेच्या चाव्या महाविकास आघाडीच्या हाती

Published by :

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासाठी महत्वाची असलेल्या मुंबई बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपचा पराभव झाला आहे. मुबै बॅंकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे निवडून आले आहेत. तर उपाध्यक्षपदी भाजपचे विठ्ठलराव भाोसले निवडून आले आहेत.त्यामुळे मुबै बॅंकेच्या चाव्या महाविकास आघाडीच्या हाती आल्या आहेत. त्यामुळे प्रविण दरेकरांना मोठा धक्का बसला आहे.

मुबै बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपच्या प्रसाद लाड यांचा 2 मतांनी पराभूत झाला आहे. तर राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे मुबै बॅंकेचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे आता मुबै बॅंकेवर सेना- राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शिवसेना नेते मिलींद नार्वेकरांच्या खेळीने हा निकाल लागला आहे. या निकालामुळे भाजपसह प्रविण दरेकरांना मोठा धक्का बसला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com