न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी माजी सीईओ अटकेत

122 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात याला अटक करण्यात आले आहे.
Published by :
Team Lokshahi

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेच्या सर्व व्यवहारांवर बंधनं घातली होती. त्यानंतर बँकेसंदर्भातील अनेक अपडेट्सदेखील समोर आल्या आहेत. अशातच आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.

आता न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ह बँक अहपारप्रकरणी बँकेचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू सुरेंदर भोनला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केले आहे. 122 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात याला अटक करण्यात आले आहे. याआधी बँक व्यवहार घोटाळा प्रकरणी बँकेचे महाव्यवस्थापक आणि प्रमुख लेखापाल हितेश मेहता आणि बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com