महाराष्ट्र
Jalgaon Unlock | जळगाव जिल्ह्यात नवीन नियमावली लागू
मंगेश जोशी | जळगाव जिल्ह्यात कोरोनासह डेल्टा व डेल्टा प्लस विषाणूच्या संसर्गामुळे बाधित झालेले रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील निर्बंधामध्ये वाढ करण्यात आली आहे. हे निर्बंध 27 जून 2021 सकाळी पाच वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू असणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
नवीन नियमावली
- सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक व इतर दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार
- अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार, रविवारी दुकाने पूर्ण बंद राहणार
- शॉपिंग मॉल, चित्रपट गृह, नाट्यगृह मल्टिप्लेक्स पुढील आदेशापर्यंत बंद
- शाळा महाविद्यालय शैक्षणिक प्रशिक्षण कोचिंग क्लासेस राहणार बंद
- लग्न समारंभ 50 टक्के क्षमतेसह दुपारी चार वाजेपर्यंतच मुभा
- अंत्यविधीसाठी 20 लोकांची उपस्थितीची मर्यादा
- जिम, सलुन, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर 50% ग्राहक क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असून एसीचा वापर करण्यास मनाई
- कृषी संबंधित कामे दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार.
- सार्वजनिक वाहतूक 100% सह सुरू राहणार
- शासकीय निमशासकीय कार्यालय बँक 50% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहणार
- सकाळी पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी जमावबंदी लागू असेल