Malegaon
Malegaon

Malegaon : मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी घडणाऱ्या घडामोडीत नवीन ट्विस्ट; कट्टर विरोधक असलेल्या इस्लाम पार्टी सोबत एमआयएमने हात मिळवणीचे दिले संकेत

मालेगाव महापालिकेत सत्तास्थापनेसाठी वेगाने घडणाऱ्या घडामोडीत एक नवीन आणि सर्वाना चकित करणारा ट्विस्ट समोर आला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Malegaon) मालेगाव महापालिकेत सत्तास्थापनेसाठी वेगाने घडणाऱ्या घडामोडीत एक नवीन आणि सर्वाना चकित करणारा ट्विस्ट समोर आला. एमआयएमने ज्या पार्टीच्या विरोधात निवडणूक लढवली त्या इस्लाम पार्टी सोबत जाण्याचे संकेत दिले आहेत.

मालेगाव महापालिकेच्या 84 जागा साठी झालेल्या निवडणुकीत जनतेने कोणत्याही पक्षाला बहुमत दिले नाही. सर्वात जास्त 35 जागा इस्लाम पार्टीने जिंकल्या असून त्यांचा सहयोगी असलेल्या समाजवादी पार्टीला 5 जागा मिळाल्या त्यामुळे दोघांची मिळून संख्या 40 झाली असली तरी बहुमतांसाठी लागणाऱ्या तीन जागा त्यांना कमी पडत आहे.

कट्टर विरोधक असलेल्या इस्लाम पार्टी सोबत एमआयएमने हात मिळवण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे.

Summary

  • मालेगाव महापालिकेत सत्तास्थापनेसाठी वेगाने घडणाऱ्या घडामोडीत एक नवीन ट्विस्ट

  • पहिल्यांदाच मालेगाव महापालिकेवर इस्लाम पार्टीची सत्ता येणार

  • कट्टर विरोधक असलेल्या इस्लाम पार्टी सोबत एमआयएम हात मिळवण्याचे संकेत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com