New Year
New Year

New Year : देवदर्शनाने नववर्षाचे स्वागत; मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी

सरत्या वर्षाला निरोप देत संपूर्ण देश नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(New Year ) संपूर्ण देश नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. राज्यात सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे.

आतषबाजी करत सरत्या वर्षाच्या आठवणींना निरोप देत सर्वांनी नववर्षाचे स्वागत केलं. अनेकजण नवीन वर्षाची सुरूवात देवदर्शनाने केली जाते. नवीन वर्षाचं स्वागत अनेकांनी प्रसिद्ध देवस्थानांना भेट देऊन केलं आहे. मुंबईतील सिध्दिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. तर पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात पुणेकरांनी नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाचे दर्शन घेऊन केली.

कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर, पंढरपूरचं विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि शिर्डीच्या साई मंदिरातही भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय. नवीन वर्षाची सुरुवात देव दर्शनाने व्हावी यासाठी राज्यातील प्रसिद्ध मंदिरात आज पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली आहे.देवदर्शनाने नव्या वर्षाचा नवा संकल्प करण्यासाठी भाविक मंदिरांमध्ये दाखल झाले आहेत. भाविकांकडून देवदर्शनाने नववर्षाचे स्वागत करण्यात येत आहे. यासाठी मंदिर प्रशासनही सज्ज आहे.

Summary

  • 2026 या नवीन वर्षाचं स्वागत अनेकांनी प्रसिद्ध देवस्थानांना भेट देऊन केलं

  • मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी

  • भाविकांकडून देवदर्शनाने नववर्षाचे स्वागत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com