Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय हालचालींना वेग; बावनकुळे आणि शिरसाट यांची रात्री बैठक
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Chhatrapati Sambhajinagar) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच छत्रपती संभाजीनगरात राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
महानगरपालिका निवडणूक शिवसेना-भाजप महायुती लढवण्यासंदर्भात भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांची रात्री बारानंतर भेट झाली असून जागावाटपाच्या बैठकीत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे संजय शिरसाट यांच्या घरी रात्री उशिरा दाखल झाले. या बैठकीसाठी भाजप मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड, आमदार संजय केनेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे उपस्थित होते.
Summery
छत्रपती संभाजीनगरात राजकीय हालचालींना वेग
बावनकुळे आणि शिरसाट यांची रात्री बैठक
शिवसेना-भाजपच्या जागावाटपाबाबत चर्चा
