Nitesh Rane : चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार; नितेश राणेंचे सुचक ट्वीट

Nitesh Rane : चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार; नितेश राणेंचे सुचक ट्वीट

“संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय? सरकार वाचविण्यासाठी? चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार!”,
Published by :
Shweta Chavan-Zagade

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. याचदरम्यान भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे.

“संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय? सरकार वाचविण्यासाठी? चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार!”, असे नितेश राणे यांनी केले आहे.

Nitesh Rane : चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार; नितेश राणेंचे सुचक ट्वीट
"उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण"

दरम्यान एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत ठाकरेंनी त्यांच्या अट मान्य न केल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता हे सरकार पडणार का ? आणि मुख्यमंत्री राजीनामा देणार का? असा चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय सरकार बरखास्त झाल्यास मध्यावर्ती निवडणुका देखील लागू शकतात असा देखील त्यांच्या ट्विटचा अर्थ होतो. त्यामुळे राऊत यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा निवडणुकीची धमकी दिली की काय? अशी चर्चा सुरु होती आणि याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते नितेश राणे यांनी ट्टिट करत राज्यात नवं सरकार येणार असं म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com