Nitesh Rane
महाराष्ट्र
Nitesh Rane : वसई-विरार महापालिकेत नितेश राणेंची प्रचार रॅली आणि सभा
महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nitesh Rane) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिकेत नितेश राणेंची तोफ धडाडणार आहे.
आज वसई-विरारमध्ये नितेश राणे यांची प्रचार रॅली आणि सभा पार पडणार आहे. या सभांकडे सर्वांचे लक्ष लागले असून या सभेतून ते काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
बहुजन विकास आघाडीला धक्का देण्यासाठी भाजपची खेळी
भाजपचे नेते नितेश राणेंना उतरवणार मैदानात
वसई-विरार पालिकेत नितेश राणेंची तोफ धडाडणार
