Nitin Gadkari : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मुलाखतीचं आयोजन; अभिनेत्री गिरिजा ओक मुलाखत घेणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nitin Gadkari) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.
सभांचा धडाका सुरू असल्याचे पाहायला मिळत असून मुलाखती घेतल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून देवेंद्र फडणवीस यांच्या तर्री पोहा विथ देवभाऊ या कार्यक्रमानंतर आता नितीन गडकरीं चना पोहा विथ नितीनजी या माध्यमातून गडकरी संवाद साधणार आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक नितीन गडकरी यांची मुलाखत घेणार आहे.
Summary
नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन
चना पोहा विथ नितीनजी या माध्यमातून साधणार संवाद
