Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde : विधानभवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दालन आहे, मात्र कार्यालयच नाही

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयासाठी अद्याप ठोस जागा मिळालेली नाही.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Eknath Shinde ) विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयासाठी अद्याप ठोस जागा मिळालेली नाही. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्र्यांकडे दालन असले तरी कार्यालयासाठी आवश्यक कक्ष उपलब्ध न झाल्याने त्यांच्या स्टाफला मंत्रालयातच बसावे लागत आहे.

शिंदे यांचे दालन विधानभवनाच्या तळमजल्यावर असून शेजारील कक्षात त्यांचे प्रधान सचिव नवीन सोना कार्यरत आहेत. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदेंच्या स्टाफसाठी पहिल्या मजल्यावर मोठे दालन उपलब्ध होते, जिथे पीएस, ओएसडी, जनसंपर्क अधिकारी, सहसचिव यांचं कामकाज चालायचं. परंतु, सध्या ती जागा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदेंच्या स्टाफला ना कामाची योग्य जागा, ना आवश्यक सुविधांचा उपयोग करता येतो.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आठवड्याभरापूर्वीच अधिकृत पत्र पाठवून स्टाफसाठी दालन उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. मात्र, अद्याप कोणतीही सकारात्मक कारवाई झालेली नाही. दरम्यान, शिंदे यांच्या दालनाशेजारील काही कक्ष उपमुख्यमंत्री कार्यालयाला मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, सध्या ही दालने विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे आहेत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com