uddhav thackeray
uddhav thackeray Team Lokshahi

उद्धव ठाकरेंच्या सभेआधी भाजप पदाधिकाऱ्यांना बजावल्या नोटीसा

Uddhav Thackeray Sabha : विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी बजावली नोटीस

औरंगाबाद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बुधवारी भव्य सभा होणार आहे. या सभेची 80 टक्के तयारी पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी दीड हजार पोलिसांचे (Police) सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत.

uddhav thackeray
Job Updates : नोकरी शोधताय ? जाणून घ्या कुठे, किती जागा...

उध्दव ठाकरे यांच्या जंगी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगडा बंदोबस्त उभारला आहे. तर, सभेआधी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत. विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी ही नोटीस बजावली आहे.

आंदोलनकर्त्या भाजप कार्यकर्त्यांना हमीदाराशिवाय मोकळे सोडता येणार नाही, असे या नोटीसीमध्ये नमूद आहे. तसेच, एक वर्ष मुदतीचे शांतता राखण्याकामी बंधपत्र का घेण्यात येऊ नये, असे नोटीसमध्ये प्रशासनाने प्रश्न उपस्थित केला आहे. व भाजप कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटीसीमध्ये सांगण्यात आले आहे.

uddhav thackeray
विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सुभाष देसाई, आमशा पाडवी यांची नावं निश्चित?

दरम्यान, उध्दव ठाकरे यांच्या सभेसाठी दीड हजार पोलिसांचा बंदोवस्त असणार आहे. तर, एसरपीएफच्या तब्बल 2 तुकड्या तैनात जाणार केल्या. परंतु, उध्दव ठाकरे यांच्या सभेच्या तोंडावर औरंगाबादेत कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. अशात उध्दव ठाकरे यांची सभा सुपर स्प्रेडर ठरू शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

uddhav thackeray
नुपूर शर्माचे 'ते' वादग्रस्त वक्तव्य; RSS कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com