Sachin Vaze | वाझे प्रकरणात आता वाझेंच्या एक्स गर्लफ्रेंडची एन्ट्री ?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात एनआयएच्या तपासातून आणखी एक बाब समोर आली आहे. अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं आढळून आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. या मुद्दा गाजत असतानाच मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. हिरेन यांच्या हत्येमागील कारणांचा हळूहळू उलगडा होत असून, तपासातून नवी माहिती समोर आली आहे. NIA आता पर्यंत केलेल्या तपासामध्ये ८ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
आता NIA कडून नवीन माहित समोर येत आहे. ट्रायडेंट हॉटेलच्या सीसीटीव्हीच्या व्हिडीओ मध्ये एक महिला दिसत आहे. CCTV आढळलेली ही महिला एक्स गर्लफ्रेंड असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
वाझेच्या याच एक्स गर्लफ्रेंडची घरी NIA ने चापेमारी मारली आहे. आता या प्रकरणी प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा पुढे काय तपास करणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.