Laxman Hake
Laxman Hake

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्रांना पत्र; पत्रात काय?

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Laxman Hake) ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. लक्ष्मण हाके पत्रात म्हणाले की, 'सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील OBC आरक्षणासंदर्भात दिलेल्या आजच्या निर्णयाचे आम्ही गांभीर्याने स्वागत करतो. न्यायालयाने स्पष्ट केलेली ५०% आरक्षण मर्यादा आणि तिच्या चौकटीतील OBC आरक्षणाची अंमलबजावणी — हा संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्यायासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे.राज्य सरकारने न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार OBC आरक्षणाचा स्पष्ट, व्यावहारिक आणि तातडीने अंमलबजावणीयोग्य असा आराखडा जाहीर करावा, ज्यामुळे आगामी निवडणूक प्रक्रियेत आवश्यक ती पारदर्शकता आणि स्पष्टता निर्माण होईल.'

'OBC प्रतिनिधित्व, सामाजिक-शैक्षणिक पिछडेपणाचे अद्ययावत मूल्यांकन आणि स्थानिक संस्थांतील जागांचे वितरण एससी आणि एसटी बांधवांच्या सुचिबद्द आरक्षणाचा सन्मान करत न्याय धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे. या प्रक्रियेत OBC समाजातील विविध घटक, तज्ज्ञ आणि प्रशासन यांच्यात सकारात्मक, संविधानसंगत आणि शांततापूर्ण संवाद साधून निर्णय होणे अपेक्षित आहे.'

यासोबतच ते पुढे म्हणाले की, 'ओबीसी आरक्षण हा कोणत्याही समाजघटकाविरुद्धचा विषय नसून प्रतिनिधित्व, समानता आणि सामाजिक न्याय यांचा प्रश्न आहे. त्यामुळे सर्व समाजघटकांनी शांतता, ऐक्य आणि परस्पर आदर राखण्याचे आम्ही विनम्र आवाहन करतो. मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रातील ओबीसी आपल्याकडून प्रचंड आशादायी आहे तेव्हा ओबीसी प्रतिनिधी ची व्यापक बैठक आपण हिवाळी अधिवेशना अगोदर बोलवावी आणि अधिवेशनात त्यावर चर्चा घडवून आणावी अशी विनंती करतो.'असे लक्ष्मण हाके म्हणाले.

Summery

  • ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्रांना पत्र

  • सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत -हाके

  • सरकारने OBC आरक्षणाचा स्पष्ट आराखडा जाहीर करावा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com