OLA, Uber strike
OLA, Uber strike

OLA, Uber strike : ॲप आधारित टॅक्सी आणि रिक्षा चालकांची आज बंदची हाक; काय आहेत चालकांच्या मागण्या?

विविध मागण्यांसाठी बंदचा निर्णय
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • ॲप आधारित टॅक्सी आणि रिक्षा चालकांचा आज बंद

  • विविध मागण्यांसाठी बंदचा निर्णय

  • पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय बंद

(OLA, Uber strike ) पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील ॲप आधारित टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून आज बंदची हाक देण्यात आली आहे.

राज्य परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ॲग्रीगेटर्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी चालकांनी केली आहे. तसेच चांगले वेतन, विमा लाभ, पारदर्शक भाडे संरचना आणि ॲप कंपन्यांकडून मनमानीपणे चालकांची खाती निलंबित करणे थांबवावे, इंधन आणि देखभाल खर्चात प्रचंड वाढ झाली असून चालकांचे उत्पन्न कमी आहे, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी योग्य व्यवस्था नाही. आदी मागण्यांचा यामध्ये समावेश असून या सर्व मागण्या करण्यात येणार असल्याचे भारतीय गिग कामगार मंचाद्वारे सांगण्यात आलं आहे.

या बंदमुळे राज्यातील वाहतूक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी मुंबईत असल्यामुळे त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा आजचा संप पुकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com