Omicron Variant | लहान मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका, WHOचा इशार

Omicron Variant | लहान मुलांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका, WHOचा इशार

Published by :
Published on

दक्षिण आफ्रिकेमधून जगभरामध्ये प्रादुर्भाव झालेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटबद्दल भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांमध्ये होणाऱ्या कोरोना संसर्गााबाबत एक महत्त्वाची माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोपातील कार्यालयाने मंगळवारी सांगितले की, ५ ते १४ वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे संक्रमण वेगाने वाढतेय. त्यामुळे लहान मुलांना ओमिक्रॉन सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले जातेय.

WHO च्या युरोपियन प्रादेशिक संचालक डॉ. हंस क्लुगे यांनी सांगितले की, लसीकरणामुळे दिलासा मिळत असून मृत्यू होणाऱ्यांची संख्याही कमी आहे. मात्र ५३ देशांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यांची संख्या दुप्पट झाली आहे, डेल्टा व्हेरिएंट अजूनही पसरत आहे यादरम्यान २१ देशांमध्ये ओमिक्रॉनची ४३२ प्रकरणे समोर आली आहेत. डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण अजूनही युरोप आणि मध्य आशियामध्ये आढळून येतायत. परंतु लसीकरणामुळे गंभीर आजार आणि मृत्यू रोखण्यास मदत होतेय. मात्र ओमिक्रॉन हा व्हेरिएंट गंभीर आहे की नाही हे स्पष्ट होणे अद्याप बाकी आहे.

मुलांमध्ये ओमिक्रॉन संसर्गाची २ ते ३ पटीने वाढ
युरोपातील अनेक देशांमध्ये लहान मुलांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण दोन ते तीन पटीने वाढल्याने क्लुगे यांनी चिंता व्यक्त केलीय. शिवाय वृद्ध, आरोग्य सेवा कर्मचारी आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या लोकांच्या तुलनेत लहान मुलांना संसर्गाचा कमी सामना करावा लागतोय. मात्र घरातील मोठ्या वयस्कर व्यक्तींमुळे मुलांना संसर्ग होण्याचा धोका वाढतोय. अशातच मुलांचे लसीकरण न झाल्याने गंभीर संसर्गाचा किंवा मृत्यू होण्याचा धोका १० पटीने वाढतोय. त्यामुळे लहान मुलं या संसर्गास कारणीभूत ठरु शकतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com